04/02/26
Breaking News

सेलूत ” मेरी जान तिरंगा है ” कार्यक्रमाचे आयोजन

सेलू / नारायण पाटील – भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सेलूतील लोकप्रिय गायक व कलाकारांचा ” आम्ही कलाकार ” या देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम दि १५ औगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे .
येथील महेशनगर मधील नगर परिषदेच्या साई नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमासाठी अध्यक्षपदी राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा .ना.मेघना साकोरे ( बोर्डीकर )यांची उपस्थिती राहणार आहे .

 

तसेच ग्लोबार्क सोल्युशन चे संस्थापक ध्रुव साकोरे ,शेतकरी संघटनेचे किशोर जोशी ,भा ज प चे जिल्हाउपाध्यक्ष दिनकरराव वाघ ,कृ उ बा चे संचालक रामेश्वर राठी ,उद्योजक गोपाल काबरा ,व्हाईस ऑफ मीडिया चे अध्यक्ष शिवाजी आकात ,भा ज प चे तालुकाध्यक्ष गणेश काटकर ,शहराध्यक्ष अशोक शेलार ,माजी नगरसेवक मनीष कदम ,ज्योतीताई मोगल ,विठ्ठल कोकर ,रूपालीताई ठाकूर ,संध्याताई चिटणीस व गणेश सवणे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती राहणार आहे .

यावेळी सच्छिदानंद डाखोरे ,दीपक देवा ,शिरीष संघई ,संजय मंडलिक ,सुरेंद्र दिशागत ,संतोष कुलकर्णी ,पूजा तोडकर ,सायली दिग्रसकर ,स्वाती तांबे ,उजेनवी संघई हे देशभक्तीपर गीते सादर करणार आहेत .
यावेळी सिंथेसाइझर साथ नइम शेख ,कीबोई साथ अजित शेवाळे ,ढोलक साथ सिधोधन कदम ,तबला साथ गिरीश दीक्षित तर ऑक्टोपॅड साथ आदित्य डावरे हे करणार आहेत .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री सोनेकर व अशोक जैस्वाल हे करणार आहेत .
हैद्राबाद येथील कल्पना कांबळे या या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत .
तरी सर्व रसिक व देशप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे .असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक माजी जी प सभापती अशोकराव काकडे यांनी केले आहे .

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …