परभणी,दि 14 (प्रतिनिधी)ः
ज्ञानेश ध्रुपद संगीत व शिक्षण प्रसारक संस्था आणि परभणी शहर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने नाद ज्योती त्रैमासिक संगीत सभेचे रविवारी (दि.17) सायंकाळी 7 वाजता येथील बी.रघुनाथ सांस्कृतिक सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. या त्रैमासिक संगीत सभेत पं.जितेंद्र अभिषेकी यांचे नातू श्री.अभेद शौनक अभिषेकी, मयंक व अभिराम परळीकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.
यावेळी गीत इनामदार तबला, ॠतुराज भोसले पखवाज, मंगेश जवळेकर हार्मोनियम साथसंगत करणार आहेत. या संगीत सभेचे उद्घाटन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्याहस्ते होणार आहे. संगीत सभेत सर्व संगीतप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन ज्ञानेश ध्रुपद संगीत व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॠतुराज भक्तराज भोसले आणि महापालिका आयुक्त यांनी केले आहे.
Shabdraj www.shabdraj.com