सेलू,दि 22 ( प्रतिनिधी )
हिंदू धर्मात अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण महिण्याचे औचित्य साधून येथील ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब संस्थान व श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान ,सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने केशवराज बाबासाहेब मंदिर मध्ये चालू असल्येल्या या अभिनव उपक्रमाची उद्या सांगता होणार आहे .
दि २५ जुलै ते २३ औगस्ट या कालावधीत दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा तर १७ ते २३ औगस्ट या कालावधीत दररोज सकाळी ७ ते १० या वेळेत सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला .यावेळी मुख्य वाचक म्हणून ह भ प गुलाबराव लहाने ,ह भ प अशोकराव आकात व ह भ प मोहन हातकडके यांनी केले तर ५५ भाविक महिला व पुरुषांनी या पारायण सोहळ्यात सहभाग नोंदवला होता .
दि २३ औगस्ट शनिवार रोजी या उपक्रमाची सांगता होणार असून सकाळी ७ ते ९ यावेळेत सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे .त्यानंतर सकाळी १०.३० ते १२ या वेळेत ह भ प शंतनू शिवाजीराव पाठक यांचे काल्याचे कीर्तन व १२ ते २ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .रात्री प्रवचनकार ह भ प सौ सुजाताताई ओमप्रकाश भंडारे ( परभणी ) या समारोपाची प्रवचन सेवा देणार आहेत .
गेल्या २१ वर्षांपासून अखंडित पणे ही प्रवचन सेवा व ज्ञानेश्वरी चे सामुहिक पारायण कार्यक्रम सुरू आहे .यामध्ये ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक कसल्याही प्रकारचे मानधन न घेता अगदी नियोजित वेळेत आपली सेवा देतात .अनेक मान्यवर भागवतकार व किर्तनकारानी या सोहळ्यात आपली सेवा दिलेली आहे .अगदी नियोजित वेळेतच प्रवचन सेवा हे कार्यक्रमाचे विशेष महत्व असून यु ट्यूब वर मोबाईल द्वारे देखील लिंकदेऊन ही सेवा उपलब्ध करून दिली .ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गंगाधर कान्हेकर ,पुष्कर माणकेश्वर ,गोविंद परतानी व बालासाहेब (भैया ) वैजुडकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले .
केशवराज बाबासाहेब संस्थान व श्री ज्ञानेश्वरी आराधना मंडळ ,सेलू चे सर्व सदस्य हे अगदी निस्वार्थपणे आपल्या वेळात वेळ काढून महिनाभर दररोज या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविरत परिश्रम घेतात .शहरातील भाविक महिला व पुरुष श्रोते देखील मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात उपस्थित राहून श्रवनभक्तीचा आनंद घेत असतात .
त्यामुळेच श्रोत्यासाठी पर्वणीच ठरत असलेल्या कार्यक्रमाची सर्वचजण दरवर्षी वाट पहात असतात .
असंख्य भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात .
Shabdraj www.shabdraj.com