पूर्णा : आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात पूर्णा येथे राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. उमाशंकर मिटकरी प्रा. राजेश पर्लेकर श्री अशोक कदम श्री गजानन भालेराव श्री कालिदास वैद्य यांची उपस्थिती होती.
या वेळी प्रा. उमाकांत मिटकरी यांनी
आद्य क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जीवन कार्यावर माहिती सांगितली
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात राजे उमाजी नाईक यांच्या योगदाना विषयी माहिती देण्यात आली.राजे उमाजी नाईक हे एक भारतीय क्रांतिकारक होते ज्यांनी १८२६ ते १८३२ च्या सुमारास ब्रिटिश राजवटीला आव्हान दिले . त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी राजवटीविरुद्ध लढा दिला. त्यांच्या कार्याची येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळावी या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. डॉ. राजू शेख व प्रा.डॉ. दैवशाला कमठाणे यांनी आयोजित केला होता.
Shabdraj www.shabdraj.com