16/10/26
Breaking News

सलग बाराव्या वर्षीही सेलूच्या महिला नाट्यकलावंत ठरल्या पारितोषिकाच्या मानकरी

सेलू,दि 20 (प्रतिनिधी)ः
दि १९ सप्टेंबर रोजी नांदेड येथे कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला राज्य नाट्य स्पर्धेत सेलूच्या नाट्य कलावंतांनी यावर्षी देखील पारितोषिक पटकावले आहे. सतत १२ वर्षापासुन या स्पर्धेत परितोषक पटकवण्याचा मान त्यांना मिळाला आहे
यावेळी जयश्री सोन्नेकर लिखीत आणि दिग्दर्शीत ” पाहुणे आले हो ” हे नाटक अव्वल राहिले. अतिशय अल्पावधीत तयारी करत या नाटकाचे सादरीकरण कौतुकास पात्र ठरले.
ह्या नाटकात मोहिनी लोणीकर, मनिषा पांडे, आश्विनी पाटील, अनघा पिंपळगावकर, अनुपमा कुलकर्णी, मधुरा मैराळ,करुणा पिंपरीकर,भाग्यश्री सोन्नेकर, सायली सोनटक्के, साक्षी भांगे यांनी उत्कृष्ट भुमिका निभावल्या. विशेषत: नवोदित कलाकारांना व्यासपीठाकडून शाबासकी मिळाली.
सेलू येथील कामगार कल्याण मंडळाचे श्री सुरेश अंभोरे यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले.
टीम ने या घवघवीत यायशाबद्दल त्यांचे सर्वत्र या अभिनंदन होत असून शहरातील नाट्यकर्मी मंडळी कडून या टीमचे विशेष अभिनंदन केले जात आहे.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …