नारायण पाटील
सेलू,दि 22 ः
शहरातील शेरे परिवाराचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या शेरे गल्ली मधील जगदंबा नवरात्र महोत्सव दि २२ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात घटस्थापना करून सुरू झाला .यावेळी रमेश विठ्ठलराव शेरे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजन करण्यात आले .
दि २३ सप्टेंबर पासून देविभागवत कथेस प्रारंभ होणार असून भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर यांच्या अमृततुल्य वाणीमधून या ग्रँथाचे निरूपण केले जाणार आहे .यावेळी ऍड कृष्णा बाबाराव शेरे यांच्या हस्ते देवतांचे स्थापित पूजन व ग्रंथ पूजन केले जाणार आहे.
या महोत्सवात दररोज सकाळी ७ ते १० यावेळेत महिला देवी पारायन करणार असून महिलांचे भजन हरिपाठ ,गोंधळ ,हनुमान चालीसा पठण असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .
२९ सप्टेंबर रोजी देविभागवत कथेची सांगता होणार असून ३० सप्टेंबर रोजी होम केला जाणार आहे . दररोज दोन वेळेस मान्यवरांच्या हस्ते देवीचे पूजन व आरती केली जाणार आहे.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या महोत्सवाची सांगता होणार असून .त्या दिवशी सकाळी ११ ते १ यावेळेत हरिकीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
सायंकाळी ६ वाजता देवीची भव्य पालखी ( छबिना )मिरवणूक निघणार आहे .यामध्ये पारंपरिक वेशेत महिला व पुरुष भक्त सहभागी होणार असून कवड्याच्या माळा गळ्यात घालून व हातात पोत घेऊन आराधी महिला देखील सहभागी होणार आहेत .बँड पथक व फटाक्यांच्या अतिषबाजीत ही भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख रस्त्यावरून रात्री देवी मंदिरात येणार आहे .
मातृभक्त असलेला शेरे परिवार आपल्या या कुलदेवतेचा महोत्सव मोठ्या उत्साहात सहभागी होऊन साजरा करतात .शेरे परिवाराच्या लेकी बाळी देखील आवर्जून या कार्यक्रमासाठी माहेरी येतात .त्यामुळे शेरे परिवाराचा हा महोत्सव म्हणजे आनंदाची पर्वणीच ठरतो .
शेकडो वर्षांपासून चालत आलेला हा पारंपरिक उत्सव तरुणांच्या सहभागाने आमूलाग्र बदल होऊन गल्लीपुरता न राहता शहरातील सर्व भाविकांचा झाला आहे .नऊ दिवस मंदिर परिसरात व रस्त्याच्या दुतर्फा विद्युत रोषणाई मुळे रात्री सर्व परिसरात झगमगाट असतो .व दिवसभर शहरातील देविभक्ताची दर्शनासाठी एक प्रकारे मंदियाळीच असल्याने अक्षरशः मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप येते .
Shabdraj www.shabdraj.com