04/02/26
Breaking News

परभणीत हाहाकार..21 मंडळात ढगफुटी…..

परभणी दि.27
परभणी जिल्ह्यातील 21 महसूल मंडळात आज पहाटेपर्यंत अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.ही अतिवृष्टी नव्हे तर ढदफुटी आहे.

संपूर्ण जिल्ह्यात पाऊस सक्रिय आहे.विशेषतः पालम व गंगाखेड या दोन तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने अनेक नदी,नाल्यांना, ओढ्यांना, पूर आले आहेत. पुराच्या पाण्याने नदीवरील पूल पाण्याखाली आहेत. अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक ठप्प आहे. शुक्रवारी सायंकाळपासून चा पाऊस शनिवारी सकाळी दुपारी कायम होता .
दरम्यान
दिनांक 27 सप्टेंबर 2025 च्या अहवालानुसार तालुका निहाय अतिवृष्टी नोंद
परभणी तालुका
दैठणा 79.00
पिंगळी 65.8
परभणी ग्रामीण 65.8,
गंगाखेड तालुका गंगाखेड 106.3
महादपुरी 91.5
माखणी 82.3 राणीसावरगाव 143 पिंपळदरी 111.3,
पूर्णा तालुका
पूर्णा 75
ताडकळस 97.8
लिमला 77
कातनेश्वर 67.5
चुडावा 85.8
कावलगाव 99.8, व
पालम तालुका
पालम 153.3
चाटोरी 143
बनवस 139.8
पेट शिवनी 111.5
रावराजुर 113.0
सोनपेठ तालुका आवलगाव 65.8
वडगाव 76.8 या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …