गंगाखेड,दि 27
गंगाखेड तालुक्यातील जवळा रूमणा येथील हनुमान मंदिराच्या शिखरावर शुक्रवारी रात्री वीज पडून मंदिराचं नुकसान झाले.शिखरावर असलेल्या 8 मुर्त्या जमिनीवर कोसळल्या अशी माहीती ग्रामस्थांनी दिली.
महिनाभरापासून या भागात अतिवृष्टी होत आहे.शुक्रवारी देखील दिवसभर पाऊस झाला. रात्रीच्या वेळेला पावसाचा वेग वाढला रात्री दहा ते एक या दरम्यान मोठा पाऊस झाला. शनिवारी पहाटेच्या सुमारास देखील जोरदार पावसाला सुरू झाली. दुपारी एक वाजेपर्यंत हा पाऊस जोरदार होता. या पावसामुळे अनेक गावांना पुराचा वेढा पडला तसेच विविध मार्ग देखील बंद झाले.रात्रीच्या वेळी जवळा रूमणा येथील हनुमान मंदिराच्या शिखरावर शुक्रवारी रात्री वीज पडून मंदिराचं नुकसान झाले.शिखरावर असलेल्या 8 मुर्त्या जमिनीवर कोसळल्या आहेत.
पाच गावचा संपर्क तुटला
गंगाखेड तालुक्यातील खळी परिसरात शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने ओढ्याला पूर येऊन मैराळ सावंगी, चिंचटाकळी, गौंडगाव, ब्रम्हनाथ वाडी पुनर्वसनखळी या पाच गावांचा संपर्क तुटला.शनिवारी देखील हीच परिस्थिती कायम होती.
Shabdraj www.shabdraj.com