24/03/26
Breaking News

परभणी–जालना–परभणी विशेष गाडी रोज धावणार

परभणी – दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून परभणी–जालना–परभणी दरम्यान चालविण्यात येणारी विशेष गाडी (क्र. 07663/07664) याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

 

ही विशेष गाडी 20 सप्टेंबरपासून आठवड्यातून चार दिवस (मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार) चालविली जात होती. मात्र आता दिनांक 2 ऑक्टोबरपासून ही गाडी दैनंदिन धावणार असून आठवड्याचे सातही दिवस सेवा उपलब्ध होईल.

गाडी क्र. 07663 (परभणी–जालना)
प्रस्थान : परभणी – सकाळी 07.10
आगमन : परतूर – 08.29, प्रस्थान 08.30
आगमन : जालना – 09.30

गाडी क्र. 07664 (जालना–परभणी)
प्रस्थान : जालना – सायंकाळी 17.30
आगमन : परतूर – 18.15, प्रस्थान 18.16
आगमन : परभणी – रात्री 20.00

ही गाडी 2 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत रोज धावेल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

Check Also

ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा

पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. …