रमेश बिजुले
पाथरी,दि 08 ःपाथरीत अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापनेचा प्रस्ताव मंजूर झाल्याने यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा सत्कार पाथरी येथील वकिल संघाने करुन त्यांचे आभार मानले आहेत.
तत्कालीन पालकमंत्री नवाब मलीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी येथे वरिष्ठ स्तर न्यायालय व अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालय स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. पाथरी शहर हे सोनपेठ, मानवत व सेलू या तीन तालुक्याच्या मध्यभागी आहे व तालुक्याचे ठिकाण आहे. तिन्ही तालुक्यांपासून जवळपास 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असून जनतेसाठी भौगोलीकदृष्ट्या सोयीस्कर आहे. याउलट परभणी शहर हे सर्वांसाठी दूर असून खर्चीक आहे. तसेच पाथरीसह तिन्ही तालुक्यातील सर्वसामान्य जनता, वकील, पक्षकार व साक्षीदार यांचा वेळ व पैश्यांचा अपव्यय टाळण्याकरिता पाथरीतच हे न्यायालय स्थापन करण्यात यावे अशी मी मागणी केली होती. या मागणीला जिल्हा नियोजन समितीच्या सर्व सदस्यांनी अनुकूलता दर्शवली व समितीने एकमुखाने तो ठराव मंजूर केला होता. त्यानंतर शासन स्तरावर यासंबंधीची प्रक्रिया सुरू होऊन पाथरीत अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालय कार्यान्वित झालेले आहे.त्या निमीत्ताने पाथरी वकिल संघाच्या वतीने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले.यावेळी अँड कौंत , अँड कुलकर्णी, अँड मगर , सिद्दीकी अँड घुमरे अँड गात, अँड मगर, अँड कदम, अँड सिद्दिकी, अँड ,घुमरे ,अँड अन्सारी अँड आरबाड अँड पोटभरे अँड महिपाल अँड चव्हाण अँड दाभाडे अँड निसर्ग अँड खुरखान पठाण अँड खेडेकर अँड तळेकर अँड गालफाडे अँड आरबाड अँड पोटभरे अँड कांबळे अँड मुजाहिद अन्सारी अँड रोकड़े अँड हिवाळे उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com