14/07/26
Breaking News

शाळांमधून सुरक्षा समिती,तक्रारपेटी अधिक सजग होणे आवश्यक

सेलू(प्रतिनिधी.)दि 08
सेलू मध्ये पोक्सो अंतर्गत दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर शहरासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.यामध्ये पीडित या अल्पवयीन आहेत तर आरोपींमध्ये एका शिक्षकाचा सहभाग असल्याने शिक्षण विभागाने देखील शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी असलेल्या समित्या अधिक सजगपणे कार्यरत करणे आवश्यक असल्याचे मत पालकांमधून व्यक्त होत आहे.
शाळा स्तरावर विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी विद्यार्थी सुरक्षा समिती,सखी सावित्री समिती ,तक्रार निवारण समिती अशा समित्या आहेत.त्यातच शाळांमध्ये दर्शनी भागात तक्रार पेटी देखील लावण्याचे आदेश शिक्षण विभागाने प्रत्येक शाळांना दिलेले आहेत.तसेच ही तक्रार पेटी दर बुधवारी व शनिवारी उघडून त्यात आलेल्या तक्रारींचे निवारण करणे क्रमप्राप्त आहे.याबाबत पालकांनी देखील सजग असणे गरजेचे आहे.सेलू मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे.या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने आणि शाळांनी देखील अधिक सजगपणे या समित्यांचे काम करून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेची भावना वाढवणे आवश्यक आहे.शिक्षण विभागाने देखील प्रत्येक शाळेतील या समिती प्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेणे गरजेचे आहे.सध्या परीक्षा सुरू आहेत.यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत.दिवाळी नंतर दुसऱ्या सत्रात मात्र या समित्यांची वेळोवेळी आढावा घेऊन विद्यार्थ्यांसाठी सुरक्षेचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.

Check Also

हिंगोली जिल्हा परिषदेत ‘राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान’ अंतर्गत विभागप्रमुखांचे प्रशिक्षण संपन्न!

​१६ व्या वित्त आयोगाच्या निधीचा प्रभावी वापर आणि शाश्वत विकासाच्या नियोजनावर भर; मुख्य कार्यकारी अधिकारी …