04/02/26
Breaking News

परभणी भाजपात इनकमिंग वाढले,तरुण कार्यकर्त्यांनी घेतला प्रवेश

परभणी : भारतीय जनता पार्टी परभणी महानगर कार्यालय, वसमत रोड येथे आज झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात प्रवेश केला.

पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये आदित्य थिटे, वेदांत शिंदे, अमित बायस, स्वयंम पदमगिरवर, समय कदम, अथर्व कदम, प्रथमेश भरोसे, प्रसाद शिंदे, गणेश चिलपीपरे, समर्थ देवडे, सौरभ देवकते, यश घाटोल, रितेश शिंदे, अर्जुन परिहार, जय थिटे, ओंकार पाते, हर्षल काळे, आयुष कदम, केदार अंबेकर, यश डोंगरकर, वेदांत डोंगरकर, सिद्धांत शिंदे, व्यंकटेश काळबांडे, हरिदास काळबांडे, रवि शिंदे, चक्रधर गरड, बाळा घनसावंगी, अमेर शेख, विवेक काळे, दिनेश राखोंडे, कार्तिक आणेरव, कृष्णा काळे, सुमित सातपुते, गौरव कांकल, अनिकेत शिंदे, वैभव आढे, व्यंकट मगर यांचा समावेश असून आणखी अनेक तरुणांनीही पक्षात प्रवेश केला.

या नव्या कार्यकर्त्यांचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, अजिंक्य गोंडेस्वार आणि भालचंद्र गोरे यांनी स्वागत करून अभिनंदन केले.या प्रसंगी जिल्हाध्यक्ष भरोसे म्हणाले, “भाजप हा तरुणांचा पक्ष असून, देशाच्या विकासात तरुणांची भुमिका अत्यंत महत्त्वाची आहे. समाजकारण आणि राष्ट्रसेवेसाठी भाजपच योग्य व्यासपीठ आहे.”या पक्षप्रवेशामुळे परभणी महानगर भाजपात नवचैतन्य आणि तरुण ऊर्जेची भर पडल्याचे समाधान पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …