सेलू – येथील पाथरी रोडवर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यानी प्रयत्न केल्याची घटना दि 24 ओक्टॉबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे.दि 23 ओक्टॉबरच्या मध्यरात्री 2 .15 वा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.वालुर येथे चोरट्यानी धुमाकूळ घालत दरोडा टाकल्याची घटना ताजी असतांना एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यानी केला आहे.दि 23 रोजी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.दि 24 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.या सीसीटीव्ही मध्ये एक जण सीसीटीव्ही कमेऱ्यावर कपडा टाकताना दिसत आहे.परंतु एकटीएम फोडण्यात चोरट्यांना यश आले नाही.एटीएम मधील रक्कम सुरक्षित आहे परंतु चोरट्यांनी एटीएमचे नुकसान केले आहे.सदरील घटनेची फिर्याद काल सायंकाळी बँकेचे शाखा व्यवस्थापक कृष्णा रोडगे यांनी सेलू पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
Shabdraj www.shabdraj.com