सेलू ( प्रतिनिधी )
दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेच्यावतीने आज सेलु तहसीलदार यांना दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव खेडेकर तालुकाध्यक्ष डिगांबर घोळवे यांच्या नेतृत्वात दिव्यांगांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यामध्ये शासनाच्यावतीने दिव्यांगांना प्रतिमहा 2500 रुपये पेंशनची घोषणा होऊनही सेलु तालुक्यातील 70% दिव्यांगांना 1500 रुपये पेंशन त्यांच्या खात्यावर पडत आहे तर काही दिव्यांगांना पेंशनच पडत नाही,तसेच सदर घोषणा होऊनही बराच कालावधी होऊन गेलेला असताना देखील सेलु तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधव अद्यापही सदर पेंशन रकमेपासुन वंचित आहेत तर काही बांधवांना प्रतिमहा केवळ रुपये 1500 जमा होत आहेत
याबाबत आम्ही दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार साहेबांना दोन तीन वेळेस भेटुन याबाबत माहिती दिलेली असताना तहसीलदार साहेबांनी सर्वांना 2500 रु जमा होतील असे सांगितले होते तरीही या नोव्हेंबर महिन्यात पण दिव्यांगांना 1500 रुपये एवढीच पेंशन जमा झाली आज मे तहसीलदार साहेबांना तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधवांनी भेटुन या महिन्यात जर मागच्या आँक्टोंबर महिन्याचे व नोव्हेंबर महिन्याचे राहिलेले प्रत्येकी 1 हजार रुपये असे दोन्ही महिन्यांचे सर्व दिव्यांग बांधवांचे 2 हजार रुपये आमच्या दिव्यांगांच्या खात्यावर जमा नाहि झाले तर आणि प्रत्येक महिन्याची 2500 रुपये पेंशन जमा झाली नाहि तर सेलु तहसील कार्यालयासमोर दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेच्यावतीने पुढील 15 दिवसानंतर उपोषण करण्यात येईल असे सांगितले
यावेळी दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव खेडेकर,तालुकाध्यक्ष डीगांबर घोळवे,तालुकासंघटक बालासाहेब मातने,शिवप्रसाद ठोंबरे,रामेश्वर पौळ,रामचंद्र बरसाले,शिल्पा घोडे,उषा गात,पांडुरंग गात,सुधाकर भोगावकर,पंढरीनाथ गात,दिपक शिंदे,सुरेश बरसाले,मधुकर काळे,अशोक कटारे,सुंदर पवार,मिराबाई पावडे,दिपक कटारे,पांडुरंग आघाव,कैलास निर्वळ,धोंडीराम शहाने,जनार्दन शिंदे,निशिकांत पुंगळे,दिनकर शिंदे,संभाजी अवसारे,परमेश्वर जाधव,काशीनाथ कोरे,अंकुश पावडे,अमोल दयने,गणेश खरवडे,इंद्रजीत गवारे,शिवराज डुमे,शिवरुद्र क्षीरसागर,शेख आलिम,तनविर शेख,विष्णु रोकडे,रामेश्वर वाघ,आराध्या राठोड,माणिक मगर,रामकिशन देशमुख,रुपाली कुटे आदि दिव्यांग बांधव व दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com