25/06/26
Breaking News

विद्यार्थ्यांची जडण घडण व त्याचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी स्पर्धा आवश्यक- मिलिंद सावंत

सेलू ( प्रतिनिधी )
विद्यार्थ्यांच्या जडण घडण व व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी स्नेहसंमेलनानिमित घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा आवश्यक असतात .असे प्रतिपादन नूतन नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी परितोषक वितरण सोहळा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना केले .
येथील के बा विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे परितोषक वितरण सोहळा प्रसंगी ते बोलत होते
यावेळी अध्यक्षपदी संस्थेचे अध्यक्ष ऍड अनिरुद्ध जोशी हे होते .तर प्रमुख अतिथी म्हणून नूतन नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची उपस्थिती होती .यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्रसिद्ध उद्योजक महेशराव खारकर ,संस्थेचे सदस्य ऍड किशोर जवळेकर ,प्रशालेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके व संजय धारासुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती .

मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराज व विद्येची आराध्य देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले .
संस्थेचे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून वार्षिक स्नेहसंमेलनात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा तसेच संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली .
यावेळी बोलतांना सावंत पुढे म्हणाले की ,वार्षिक स्नेहसंमेलनात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा मध्ये सहभाग घेतला तरच भविष्यात खरी प्रगती होत असते .शिक्षकांनी केलेले मार्गदर्शनातूनच विद्यार्थ्यांचा खरा विकास होत असतो.भविष्यात कोणतेही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक परितोषक कार्यक्रमात होत असते .अल्पवलीन मुलीवर होणारे दुष्कर्म घडत आहेत त्यासाठी संस्थेच्या वतीने कठोर उपाययोजना राबवल्या जातात . त्यासाठी पालकांनी संस्थेवर विश्वास ठेवावा असे आवाहन केले .
यानंतर वार्षिक स्नेहसंमेलनात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते परितोषक वितरण करण्यात आले .यावेळी कृष्णा पांचाळ ,मंगेश कुलकर्णी व किशोर खारकर यांनी यादी वाचन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश ढवारे यांनी केले तर सर्जेराव सोळंके यांनी उपस्थितांचे आभार मानले .
यावेळी संस्थेचे सन्माननीय सदस्य रामेश्वर राठी, डॉ प्रवीण जोग ,प्रवीण माणकेश्वर ,सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड ,अशोक खताळ यांची कार्यक्रमासाठी उपस्थिती होती .
दरम्यान सकाळच्या सत्रात स्नेहसमेलनातील प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना परितोषक वितरण करण्यात आले .यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर संस्थेचे सदस्य डॉ प्रवीण जोग ,प्रवीण माणकेश्वर ,विष्णू शेरे ,ललित बिनायके ,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुनील गायकवाड तसेच मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके व संजय धारासुरकर यांची उपस्थिती होती. सुचिता पितळे व कीर्ती कुलकर्णी यांनी यादी वाचन केले यावेळी सूत्रसंचालन शुभांगी भाग्यवंत यांनी केले तर नामदेव क्षीरसागर यांनी उपस्थितांचे आभार मानले .

Check Also

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या …