परभणी,दि 06 (प्रतिनिधी): जगभरातील विकसित देशांमध्ये आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर दिला जात असून आज भारत देशात त्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन डॉ.रामेश्वर नाईक यांनी केले.
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून
दर्पण दिनानिमित्ताने व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने परभणीतील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी (दि.6) सकाळी सर्व पत्रकारांसाठी सर्व रोगनिदान तपासणी शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. नाईक बोलत होते. शिबिराचे अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ.विजय मुंढे, डॉ.अंकित मंत्री, डॉ.ज्ञानेश्वर हरबक, डॉ.प्रणव कुलकर्णी, डॉ.हनुमान वायबसे, डॉ. सुजित शर्मा, डॉ.चैतन्य खिल्लारे, व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण, तालुकाध्यक्ष संतोष मगर, आदींची उपस्थिती होती. डॉ.नाईक पुढे बोलताना म्हणाले की, भारतात कॅन्सर सारखे आजार लाटेच्या स्वरूपात येतील तेव्हा आवश्यक सुविधा कमी पडतील. बदलत्या जीवनशैलीनुसार आजार वाढत आहेत. ऐनवेळी उद्भवणारे आजार कमी झाले पाहिजेत. कोणताही आजार होवू नये म्हणून प्रतिबंध ठेवला तर माणसाचे आयुर्मानही उंचावता येईल, असेही त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ.जाधव म्हणाले की, प्रत्येक वेळी समाजाला नवी दिशा देण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांचे जीवन ताण तणावाचे असते. दिवसरात्र त्यांच्यावर कामाचा ताण असतो. पत्रकारांसह सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी दररोज मोकळ्या हवेत फिरायला जाणे, सायकल चालवणे, व्यायाम किंवा योगाभ्यास करायला हवा. पत्रकारांनी ताण न घेता हसत खेळत आपले काम करावे असा सल्लाही त्यांनी दिला. प्रास्ताविकात व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी संघटनेच्या कार्याबद्दल माहिती देवून मागील वर्षी घेतलेल्या आरोग्य तपासणी शिबिरामुळे पत्रकार आरोग्याबाबत जागरूक झाल्याचे सांगितले. या शिबिरात पत्रकारांची स्क्रिनिंग करण्यात आली असून पुढील टप्प्यात एखाद्या आजाराचे निदान झाल्यास त्याबाबतचे उपचार डॉ.रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तज्ज्ञांकडून करून घेतले जातील असे सांगितले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.जयंत बोबडे तर आभार प्रदर्शन जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण यांनी केले.
शहरातील नामवंत तज्ञ डॉक्टरांचे पथक पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यासाठी उपस्थित होते. तसेच डॉ.मीनाक्षी सिसोदिया यांच्या अर्णव पॅथॉलॉजी आणि डॉ.चैतन्य खिल्लारे व डॉ.शिवकन्या रसाळ यांच्या उद्यती पॅथॉलॉजी लॅबच्या कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. या शिबिरात जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील कर्मचारी गजानन शिंदे, ज्ञानोबा पांचाळ, ज्येष्ठ पत्रकार शिवाजी वाघमारे,सुरेश जपंनगिरे,दत्तात्रय कराळे,बालासाहेब काळे,दिलीप बोरुळ,प्रवीण देशपांडे,संतोष मगर,राजन मंगरूळकर,लक्ष्मण कच्छवे, सय्यद युसुफ,आबा शिंदे,अर्जुन जाधव,लक्ष्मण फुलपगर फुलपगार,विवेक मुंदडा,सोमनाथ स्वामी, पांडुरंग दुधाटे, श्रीकांत देशमुख,नरहरी चौधरी,सुधीर बोर्डे, डी.के.इनामदार,प्रकाश वाळवंटे, अशोक झोरे,गणेश लोखंडे,विष्णू सायगुंडे,मनोज कटकुरी,रमेश जोशी,शैलेश काटकर,रमेश नाटकर,गणेश कच्छवे,गजानन साबळे,रियाज कुरेशी,लक्ष्मीकांत रासवे, अनंत रेनगडे, संग्राम खेडकर,शुभम महामुने आदी उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com