सेलू / प्रतिनिधी – पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ओळखला जातो व समाजाचा तो जागल्या म्हणून जबाबदारी सांभाळीत असतो .असे प्रतिपादन नूतन नगराध्यक्ष मिलींद सावंत यांनी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलतांना केले .
येथील अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दर्पणदिनानिमित बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .तसेच सर्व मान्यवरांचा पत्रकार संघाच्या वतीने फेटे बांधून तसेच शाल ,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन नगराध्यक्ष मिलींद सावंत होते तर बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोडगे ,मुख्याधिकारी तुकाराम कदम ,पोलीस निरीक्षक दीपक बोरसे तसेच गट नेते साइराज बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी पत्रकार संघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शहरातील जेष्ठ पत्रकार डी व्ही मुळे ,कांचन कोरडे ,नारायण पाटील ,राम सोनवणे व इसाकोद्दीन हाशमी यांचा तसेच वृत्तपत्र विक्रेते पुनमचंद खोना यांचा यथोचित सन्मान करण्यात आला .यावेळी उपस्थित नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत ठाकूर व तडवी अन्वरखान यांचें देखील यावेळी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला .
यावेळी बोलतांना सावंत पुढे म्हणाले की .सेलू शहरातील पत्रकार सकारात्मक पत्रकारिता करतात परंतु एखादया संस्थेची बातमी लिहिताना तेथील प्रमुखाची देखील प्रतिक्रिया त्यात प्रकाशित करावी .पत्रकार संघाची पत्रकार भवनासाठी जागेची मागणी दहा वर्षांपासून प्रलंबित आहे .परंतु आपण लवकरच ही मागणी पूर्ण करू .परंतु पत्रकारांनी गटबाजी न करता एकसंघ राहून काम करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली .
मुख्याधिकारी तुकाराम कदम ,सभापती डॉ संजय रोडगे ,पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी यावेळी समयोचित मनोगत व्यक्त करून पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या .पत्रकार संघाच्या वतीने महंमद इलियास यांनी मनोगत व्यक्त केले .
पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे सचिव मोहसीन मामु यांनी केले तर पत्रकार रामेश्वर बहिरट यांनी उपस्थितांचे आभार मानले .
दरम्यान सकाळी ९ वाजता व्हाईस ऑफ मीडिया च्या वतीने तालुका अध्यक्ष शिवाजी आकात व सर्व पदाधिकाऱ्यांनी दर्पणदिनानिमित लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
Shabdraj www.shabdraj.com