सेलू,दि 10 (प्रतिनिधी )
भारतीय सॉफ्टबॉल महासंघ व हरियाना सॉफ्टबॉल असोसिएशन वतीने
दि. ९ ते १२ जानेवारी झज्जर(हरियाणा) येथे होणाऱ्या सब ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी नूतन विद्यालय सेलू चा चि. स्वराज विजय सोंजे यांची निवड महाराष्ट्र राज्य संघात निवड झाल्याबद्दल राज्य सरचिटणीस डॉ. तळवलकर यांनी कळविले आहे.
धुळे येथील राज्य सब ज्युनिअर सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत परभणी जिल्हा संघातून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्वराज सोंजे यांची निवड महाराष्ट्र राज्य संघात झाली. स्वराज नूतन विद्यालय सेलू येथे ६ वा वर्गात शिकत आहे.
यास मार्गदर्शन क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, प्रसेनजीत बनसोडे,संजय भुमकर यांचे लाभले.
या यशाबद्दल नूतन संस्था अध्यक्ष डॉ सत्यनारायणजी लोया, सचिव डॉ विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, प्रशासकीय अधिकारी डॉ शरद कुलकर्णी, राज्य सरचिटणीस डॉ. तळवलकर, सहसचिव प्रा. रमाकांत बनसोडे, गटविकास अधिकारी उध्दव जाधव , गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, प्रशांत नाईक, आदी मान्यवर अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
Shabdraj www.shabdraj.com