04/02/26
Breaking News

श्री संत गोविंद बाबा मठात अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन

सेलु,ता 20 ः
येथील श्री संत गोविंदबाबा महाराज (दादुपंथी ) यांच्या पुण्यतिथी निमित्त मठ संस्थानामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व प्रवचनाचे आयोजन दिनांक २६ जानेवारी ते २३ जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे.

या अखंड हरिणाम सप्ताहात सकाळी ४ ते ६काकडा भजन, ८ ते १० ज्ञानेश्वरी प्रवचन, १० ते १२ गाथा भजन, दुपारी ४ ते ६ ज्ञानेश्वरी प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ८ ते ११ किर्तन व रात्री १२ ते ०४ हारे जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हभप एकनाथ महाराज हातडीकर, हभप केकते महाराज आंबा, हभप विष्णू महाराज यदलापूरकर, हभप विष्णू महाराज कानडी,हभप प्रभूदेवा यदलापूर , श्रीरंग महाराज बाहेगावकर, हभप बापुराव महाराज परतूरकर यांचे शुक्रवार दिनांक २३ जानेवारी रोजी काल्याच्या किर्तन व महाप्रसादाने अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी जास्तीत जास्त हरिभक्तांनी अखंड हरिनाम सप्ताह व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत गोविंद बाबा मठसंस्थान सेलू यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …