17/07/26
Breaking News

न्यू हायस्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

सेलू ( प्रतिनिधी )
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय सेलू येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू हायस्कूल शाळेचे सदस्य तथा साईबाबा नागरी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आढळकर होते. उदघाटक म्हणून स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद परभणीचे माजी सभापती अशोक काकडे यांची उपस्थिती होती . मुख्याध्यापक धनंजय भागवत, शालेय समितीचे सदस्य ऍड . अशोकराव फोफसे, प्राध्यापक विठ्ठल डख, शेषराव नागरे,शरद मगर, सांस्कृतिक विभाग प्रमुख रामेश्वर गाडेकर, रामेश्वर कदम, आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कै. विनायकराव पाटील व सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. नुकत्याच झालेल्या चित्रकला परीक्षेत न्यू हायस्कूल शाळेचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षांचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल चित्रकला शिक्षक सुनील मोरे व यशस्वी विद्यार्थ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावी मध्ये सोनम पौळ व इयत्ता बारावीचे सिद्धार्थ सावंत व अजय तांबे यांना समाज कल्याण विभागाकडून राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप प्रत्येकी 5000 रुपये मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या , कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक धनंजय भागवत यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल सादर केला . हेमंतराव आढळकर अशोक काकडे यांनी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांची कौतुक केले. आनंद नगरी, शेलापागोटे तर आई भवानी, देश रंगीला, मैने पायल है बरसाई, बम बम बोले, छम्मक छल्लो, वेड लागलं आदी 38 नृत्यप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी के तोटेवाड यांनी केले तर रामेश्वर गाडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रणयणा तेलगोटे, डी एस मोरे, बाबासाहेब आव्हाड, एस आर रोंटेवाड,संतोष कुलकर्णी, भाऊसाहेब निकम,नारायण काष्टे, अंगद मोरे, विष्णू गजमल आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमास पालक, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …