17/07/26
Breaking News

पिण्याच्या पाण्याच्या सीलबंद बॉटल मध्ये कचरा व शेवाळ

सेलू ( प्रतिनिधी )
पिण्यासाठी खरेदी केलेल्या “डीलक्स अक्वा” या ब्रँड च्या पाण्याच्या एक लिटर च्या बॉटल मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व शेवाळ आढळून आल्याने सबधितांनी याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी ,अन्न व औषध प्रशासन ,परभणी यांच्या कडे लेखी तक्रार वैभव पांचाळ यांनी दाखल केली आहे .
दि १४ जानेवारी रोजी देण्यात आलेल्या सदरील तक्रारी नुसार वैभव लिंबाजी पांचाळ व पंकज तुकाराम सुरवसे यांनी “डीलक्स अक्वा” या ब्रँड ची एक लिटर ची सीलबंद बॉटल प्रवासात खरेदी केली होती .परंतु सदरील बॉटल मध्ये मोठया प्रमाणात कचरा व बुडाला शेवाळ आढळून आले .सदरील बॉटल पठाण इंडस्ट्रीज , सेलू या उत्पादक कंपनीची असून ती बाह्यदृष्टया सीलबंद असतांना देखील आतील पाणी अत्यंत दूषित अवस्थेत असल्याचे दिसून आल्यामुळे त्यांनी तक्रार दाखल केली आहे .
सदरील बॉटल मधील पाणी हे पिण्यासाठी योग्य नसून मानवी आरोग्यास धोका निर्माण करणारे आहे .व अशा प्रकारचे पाणी विक्रीस ठेवणे यामुळे कायद्याचे स्पष्ट पणे उल्लंघन करणारे आहे .
वरील बाब अत्यंत गंभीर असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचू शकतो .यासाठी सदरील पाणी उत्पादक कंपनीच्या प्लॉट ची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितावर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नुसार योग्य ती कार्यवाही करून दूषित पाण्याचा पुरवठा तात्काळ थांबवण्यात यावा .अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे .

या गंभीर प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन देऊन बाजारात विकल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या सीलबंद बॉटल चा दर्जा किती खालावत चालला आहे .व याबाबतची वेळोवेळी तपासणी करणारे अधिकारी देखील केवळ कागदोपत्रीच तपासणी करतात की काय असा संभ्रम निर्माण होत आहे .

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …