04/02/26
Breaking News

सेलूत देशभक्तीपर गीतांनी जागवल्या स्वातंत्र्याच्या आठवणी

नारायण पाटील
सेलू,दि 27 ः
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सेलूत प्रथमच जिल्हा पोलीस प्रशासन ,परभणी व स्वरयात्री म्युझिकल ग्रुप ,सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” ए मेरे वतन के लोगो ” या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात गायिलेल्या जोशपूर्ण गीतांनी स्वातंऱ्याच्या आठवणी जागवल्या गेल्या .
येथील महेशनगर मधील नगरपरिषदेच्या साई नाट्यगृहात दि २६ जानेवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून सेलूचे पोलीस उपविभागीय अधिकारी मा. दीपक वाघमारे यांची उपस्थिती होती . तसेच पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांची उपस्थिती होती .

प्रमुख अतिथींच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी संयोजकाच्या वतीने प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमातील सहभागी सर्व कलाकार तसेच कार्यक्रमाचे संयोजक रवी मुळावेकर व रवी कुलकर्णी यांचे मान्यवरांच्या हस्ते पुस्तक व डायरी देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी मा दिपक वाघमारे यांनी प्रथमच होत असलेल्या या कार्यक्रमातील सर्व सहभागी गायकांना त्यांच्या सादरीकरण साठी शुभेच्छा दिल्या . अशा देशभक्तीपर कार्यक्रमा बरोबरच इतरही सांस्कृतिक कार्यक्रम सतत घेण्याची अपेक्षा व्यक्त केली .

कार्यक्रमाची सुरुवात सर्व सहभागी कलाकारांनी “जय जय महाराष्ट्र माझा “हे स्फूर्तिगीत सामूहिक सादर करून करण्यात आली .यावेळी सर्व स्थानिक सहभागी गायकांनी देशभक्तीपर गीते सादर करून सभागृह सद्गगथीत करून टाकले .
यामध्ये गंगाधर कान्हेकर यानी ” जहा डाल डाल पर ” हे गीत सादर केले .”ए मेरे प्यारे वतन” हे गीत डॉ .राजेंद्र मुळावेकर यांनी सादर केले . दीपक देवा यांनी ” देखो वीर जवानो आपने खून पे इलजाम न आये ” हे भावनाविवश गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
कर्मा चित्रपटातील “दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिये ” हे गीत अनघा पांडे यांनी सादर केले .
यानंतर सच्चिदानंद डाखोरे यांनी पंकज उदास यांचे “चिठ्ठी आई है वतन से चिठ्ठी आई है ” हे गीत सादर केले .
डॉ विलास मोरे यांनी “मेरे देशप्रमिओ आपस मे प्रेम करो ” हे देशभक्तीपर गीत सादर केले .
यानंतर संजय मंडलिक यांनी सैनिकांच्या शौर्याची ओळख करून देणारे ” शूर आम्ही सरदार आम्हांला काय कुणाची भीती “हे गीत सादर केले .
गुलजार यांनी रचलेले ” ए वतन वतन मेरे आबाद रहे तू “हे गीत पूजा तोडकर यांनी सादर केले .
उपकार चित्रपटातील ” मेरे देश की धरती ” हे गीत शिरीष संघई यांनी सादर केले .” जिंदगी मौत ना बन जाये सभालो यारो “हे गीत आत्माराम साळवे यांनी सादर केले .
भारताच्या सामर्थ्याचा जोश निर्माण करणारे ” सुनो गौर से दुनियावालो ,बुरी नजर ना हम पे डालो ” हे गीत डॉ आशिष मेहता सादर केले .
नया दौर चित्रपटातील ” ये देश है वीर जवानोका हे गीत डॉ विलास मोरे व डॉ राजेंद्र मुळावेकर यांनी सादर केले .
यानंतर अतुल पाटील यांनी” ‘तेरी मिट्टी मे मिल जावा ” हे गीत सादर केले .
सच्चिदानंद डाखोरे व डॉ आशिष मेहता यांनी “बॉर्डर” चित्रपटातील “संदेशे आते हैं ” हे गीत सादर केले.
हकीकत या चित्रपटातील ” कर चले हम फिदा जाने तन साथीओ ,अब तुम्हारे वतन साथीयो” हे गीत सुरेंद्र दिशागत यांनी सादर केले .
यावेळी उस्फुर्त होऊन पोलीस इनस्पेक्टर गणेश पवार यांनी .,पूरब और पश्चिम ” या चित्रपटातील ” भारत का रहनेवाला हु भारत की बात सुनाता हु ” हे तर नगरसेवक मनीष कदम यांनी ” मेरे देश प्रेमियो आपस मे प्रेम करो ” हे गीत सादर केले.
१९६२ च्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ लिहिण्यात आलेले “ए मेरे वतन के लोगो ” हे गीत सायली दिग्रसकर यांनी सादर करून सभागृहातील उपस्थितांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणले .

कार्यक्रमाचे निवेदन अतुल पाटील व अनंत विश्वभंर यांनी केले .
गंगाधर कान्हेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले .
सामूहिक राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली .

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …