09/05/26
Breaking News

फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

१२ ते १९ मार्च दरम्यान पारायण सोहळा; स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या महाभारत कथेचे आयोजन

सेलू ,दि ११ ( प्रतिनिधी) – शहरातील सातोना रोडवरील मयुरी पार्क परिसरात १२ मार्च ते १९ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित ‘फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा’ आणि स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून आयोजित महाभारत कथा सोहळ्याच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. या सोहळ्याचे नियोजन सुलभ व्हावे, या उद्देशाने सातोना रोडवरील वैष्णवी ट्रेडर्सच्या कॉम्प्लेक्समध्ये उभारण्यात आलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ५ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडले‌

 

नगराध्यक्ष मिलींद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, साईबाबा बॅंकचे अध्यक्ष हेमंतराव आडकळर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उद्योजक जयप्रकाश बिहाणी, महेश खारकर, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, दत्तराव मगर, चंद्रशखर मुळावेकर, जयराम महाराज तांगडे, कृष्णा महाराज रासवे, दत्तराव पावडे, अविनाश बिहाणी, महादेव ढवळे, माऊली चव्हाण, संजय पिंपळगावकर, रामप्रसाद चव्हाण, मारोती वाघ, श्रीपाद मसलेकर, बाबासाहेब हेलसकर, एकनाथ कटारे, योगेश सोळंके, अच्युत्तराव आंधळे, सुदाम जाधव, किसन खेडेकर, नामदेव आवटे, देवराव आबुज, ओमकार टेकाळे, मोहन हातकडके, सुनील गायकवाड, चंद्रकांत कुलकर्णी, रामेश्वर लाटे, विलास पाटील, शंकर लाटे, दत्तराव झोल, विठ्ठलराव झोल, नबाजी खेडेकर आदींसह अनेक मान्यवर तसेच ज्ञानेश्वरी प्रचारक आणि उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या आठवडाभराच्या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आणि समन्वयासाठी हे संपर्क कार्यालय कार्यरत राहणार असून, भाविकांनी अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधावा, असे आवाहन समस्त प्रचारक व ज्ञानेश्वरी प्रचारक उपासक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा वर्षपूर्ती ‘संकल्प सप्ताह’ साजरा

​हिंगोली,दि 07 ः हिंगोली जिल्ह्याला थॅलेसेमियामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ‘एक पाऊल थॅलेसेमिया …