25/06/26
Breaking News

गाई व गोवंश चोरून नेणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान सेलूची मागणी

सेलू / प्रतिनिधी – सेलू व परिसरामध्ये गाई चोरून नेणारी टोळी सक्रिय झाली आहे. सेलू शहरातून व आजूबाजूच्या गावातून अनेक गाई चोरी गेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने गाईला व गोवंशाला संरक्षित म्हणून घोषित केले आहे. तसेच महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे. ही चोरून नेलेली गाई व गोवंश बहुतेक कापण्यासाठी नेली जात असतील अशी शक्यता आहे. अशी दुभती जनावरे चोरून नेल्यामुळे लोकांचे पण आर्थिक नुकसान होत आहे. तरी तात्काळ गोवंशाची चोरी करणाऱ्यांचा शोध लावावा व त्यांना कडक शासन करण्यात यावे.

नसता श्री वेंकटेश्वर प्रतिष्ठान, सेलू च्या वतीने सनदशिर मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे निवेदन व्यकंटेश्वर प्रतिष्ठान च्या वतीने सेलू पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांना देण्यात आले आहे .

यावेळी जयसिंग शेळके, गणेश शेवाळे, पवन धुमाळ, अक्षय सोळंके,विनोद धापसे,संतोष टाले, कृष्णा शेळके, अक्षय इघवे, प्रद्युम्न आंधळे आदी उपस्थित होते.

Check Also

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या …