09/05/26
Breaking News

महापौरपदी शिवसेना ठाकरे सेनेचे सय्यद इकबाल खाजा

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या परभणी महापालिकेच्या महापौरपदी शिवसेना ठाकरे सेनेचे सय्यद इकबाल खाजा विराजमान झाले. परभणीत मुस्लिम नगरसेवकांची अधिक संख्या लक्षात घेऊन शिवसेना पक्षाने मुस्लिम चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला.

परभणीत महापौरपदासाठी गुरूवारी निवडणूक संपन्न झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काम पाहिले. शिवसेना-काँग्रेसकडे बहुमत असल्याने दोन्ही पक्षांच्या आघाडीने सत्ता स्थापन केली. त्या अनुषंगाने परभणीत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत नगरसेवकांच्या मतानुसार महापौर म्हणून सय्यद इकबाल खाजा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत महापौर म्हणून शिवसेना मुस्लिम चेहरा देणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले. सय्यद इक्बाल खाजा यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली.

सय्यद इकबाल खाजा यांना संधी का देण्यात आली?

परभणी महापालिका निवडणुकीत एकूण ३० मुस्लिम निवडून आले आहेत. ठाकरेंच्या २५ नगरसेवकांपैकी १३ मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहेत. तर उर्वरित १२ हिंदू सदस्य आहेत. मुस्लिम नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने अल्पसंख्याक समुदायाला महापौर करण्याचे पक्षाचे ठरले असल्याची माहिती समोर आली आहे.

परभणी महापालिकेतील संख्याबळ कसं आहे?

एकूण जागा ६५

शिवसेना ठाकरे : २५

काँग्रेस : १२

भाजप : १२

राष्ट्रवादी काँग्रेस : ११

जनसुराज्य शक्ती : ३

यशवंत सेना : १

इतर : १

Check Also

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा वर्षपूर्ती ‘संकल्प सप्ताह’ साजरा

​हिंगोली,दि 07 ः हिंगोली जिल्ह्याला थॅलेसेमियामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ‘एक पाऊल थॅलेसेमिया …