पाथरी,दि 09 ः
पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे शनिवारी (दि.सात) पशुसंवर्धन विभागांमार्फत लाळ खुरकूत या प्रतिबंधात्मक आजाराच्या लसीकरणाचे शिबिर घेण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन परभणी जिल्हा परिषदेचे सदस्य अण्णासाहेब रणेर यांच्या हस्ते झाले यावेळी पाथरी पंचायत समिती सदस्य श्रीधर किसनराव गिराम,सरपंच माणिकराव रणेर, पाथरी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉ बागेस बसेट, वाघाळा पशुधन केंद्राचे प्रमुख डॉ के. एन. जाधव, मदन सत्वधर व गावातील मान्यवर पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी 88 गाय वर्ग 28 म्हैस वर्ग या पशूंना लाळ खुरकूत लस देण्यात आली तसेच 142 शेळ्या व मेंढ्यांना पीपीआर लसीकरण करण्यात आले शिबिर यशस्वीतेसाठी परिसरात पशुवैद्यकीय सेवा देणारे माऊली सुरवसे, महेश कौसडीकर, लहू नेमाने, ओमकार महात्मे, कल्याण घोडके, गौरव अवचार, यांनी परिश्रम घेतले.
Shabdraj www.shabdraj.com