04/02/26
Breaking News

एलसीडी टिव्हीत साप.! रणजीत कारेगावकरांनी केले रेस्क्यू

परभणी,दि 25 ः
शहरातील  गव्हाणे चौक नजिकच्या निरस हॉस्पिटल समोरील धनुबाई प्लॉट येथील मारोती दुबाकर याचे घरी एलसीडी टिव्हीमध्ये साप आढळला. सर्पमित्र रणजीत कारेगांवकर यांनी त्याला पकडून परिवाराला भयमुक्त केले.
25 जुलै रोजी दुपारी एकच्या दरम्यान घरातील महीलांना सिरियल बघताना टीव्हीच्या पडद्यावर साप खाली वर जाताना दिसला. सुरूवातीला तो सिरियलमध्येच आहे असे वाटले पण एक दोन चॅनल बदलले तर तो खरेच आहे हे लक्षात येताच घरातील मुलींनी त्याचा व्हिडीओ केला व शेजारी राहणारे रमेश थोरात यांना कळवले, थोरात यांनी सर्पमित्र रणजित कारेगांवकर यांना बोलावले. राजेश दुबाकर हे स्वतः टिवी मेकॅनिक असल्यामुळे त्यांनी त्वरीत तो एल सी डी खोलला. टिव्हीत एका कोप-यात साप आढळला. त्याला कारेगांवकर यांनी पकडून तो कवड्या जातीचा बिनविषारी साप असल्याचे सांगत दुबाकर कुटुंबास भयमुक्त केले. यावेळी ज्ञानेश्वर खटिंग, राजेश दुबाकर यांनी कारेगांवकर यांना सहकार्य केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …