25/06/26
Breaking News

परभणीत एकाच दिवशी दोन लाचखोरांवर कारवाई

परभणी,दि 08
परभणी जिल्ह्यात एकाच दिवशी दोन लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.एका वैद्यकीय अधिक्षकांसह भूमी अभिलेख मधील वरिष्ठ लिपिकास ताब्यात घेण्यात आले आहे.

पालम येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अधीक्षक डॉ. रमेश खंदारे यांचा रुग्णालयातील कापड स्वच्छता कंत्राटदार यांच्याबरोबर व्यवहार होता, त्याच अनुषंगाने त्यांनी त्याला 50 हजारांची लाच मागितली. त्यानुसार, कंत्राट दाराकडून 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना एसीबीच्या एका टीमने अटक केली. मात्र, लाच लुचपत विभागाच्या टीमने पकडल्यानंतर हे पैसे माझे नाहीत, म्हणून खंदारे यांनी ते पैसे फेकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसीबीने त्यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

दुसरीकडे एका तक्रारकर्त्याने मंगळवार 7 एप्रिल रोजी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे एक तक्रार दाखल केली. त्याद्वारे, त्यांचे पुतणे भालचंद्र देशमुख यांचे मौजे वडी (ता.पाथरी) येथील गट क्रमांक 24 मधील शेतजमीन ढालेगांव बंधार्‍याच्या बॅक वॉटरमध्ये गेली. भूमीअभिलेख विभागाने पुनर्रचना करण्याकरीता शेतजमीनीची मोजणी केली. त्यावेळी जमीन कमी मोजण्यात आली. त्यामुळे आपले पुतणे भालचंद्र देशमुख यांनी पाथरीच्या या उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे शेतजमीनीच्या पुनर्मोजनीची मागणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी पाथरी यांनी उपअधिक्षक भूमीअभिलेख कार्यालयास सर्वे करण्याचा आदेश दिला. त्या दरम्यान आपले पुतणे देशमुख यांना ब्रेन ट्युमरचा आजार असल्याने व त्यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे आपण त्या संदर्भातील पुढील पाठपुरावा सुरु केला तेव्हा लोकसेवक असणार्‍या बिडकर याने आपल्याकडून 15 हजार रुपये लाच मागितली, असे तक्रारकर्त्याने या तक्रारीत नमूद केले.
दरम्यान, या तक्रारीच्या आधारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. तेव्हा लोकसेवक बिडकर याने मोबाईलवर या संदर्भात चर्चा करतेवेळी 8 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता पाथरीच्या उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात येऊन भेटा असे सूनावले. त्या प्रमाणे तक्रारकर्त्याने त्या कार्यालयात जाऊन पंचासमक्ष भेट घेतली, त्यावेळी संबंधित लोकसेवक बिडकर याने तडजोडीअंती 12 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
या खात्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी साई मंदिर रस्त्यावरील एका सलून समोर सापळा रचला अन् सुमारे 8 हजार रुपये लाच स्विकरतेवेळी बिडकर यास ताब्यात घेतले. या पथकाने मोबाईल हॅन्डसेटसुध्दा जप्त केला व संबंधित आरोपीच्या घराच्या झडतीची प्रक्रियाही सुरु केली होती. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. संबंधित आरोपीस ताब्यात घेतल्या गेले होते.

Check Also

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या …