26/04/26
Breaking News

“शाम ए सरगम” संगीत पारिवाराचा वर्धापनदिन साजरा

सेलु,दि 26 ः
सेलू येथील प्रख्यात “शाम ए सरगम” संगीत परिवाराने दि. 24 एप्रिल 2026 शुक्रवार रोजी त्यांचा वर्धापनदिन श्री वेदव्यासांच्या तपश्चर्येने पावन पुण्यभूमीत श्री क्षेत्र बासर येथे ज्ञान बुद्धी विद्या,संगीत, कलेची आराध्य देवता श्री ज्ञानसरस्वती देवी मातेच्या चरणी भक्ती गीताने संगीत सेवा समर्पित करुन यशस्वीरीत्या भक्तीमय वातावरणात संपन्न केला!
याप्रसंगी सहभागी कलाकार संचालक श्री शामसुंदर आढे यांनी, श्री गणेश स्तवनाने व सरस्वती मंत्र सह, सरस्वती स्तवनाने सकाळी 11-20 वा. कार्यक्रमाची सुरुवात केली. आणि देवी गोंधळ गीताने सेवा समर्पित केली!
तर मोहनराव कुलकर्णी यांनी देवी ची भक्तीगीते व श्री कृष्ण सुदामा भेटीचा वृत्तांत आपल्या गीता तून अतिशय उत्तम सादरीकरण करीत सेवा समर्पित केली,
सौ. विजया चौधरी यांनी सरस्वती स्तवन “सरस्वती च्या पदी रमते’ सह माय भवानी तुझे लेकरु, देह शुद्ध करुनी भजन करावे ने सादर करीत सेवा समर्पित केली
श्री अशोक वानरे यांनी हे स्वर की देवी सरस्वती, आईवडिलांची थोरवी, झीनी झीनी रे गुलाल मंदिरमें अशा भक्तीगीतांनी सेवा समर्पित केली.
श्री दु. का.कुलकर्णी यांनी जय मां शारदे, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, आकाशी झेप घेरे, गीता ने सेवा समर्पित केली.
श्री विनोद मोगल यांनी, देहाची तिजोरी, शोधीसी मानवा या गीतांनी सेवा समर्पित केली.
आणि श्री पंकज लांडगे यांनी मेरे चौखटपे राम, साईनाथ तेरे हजारों हाध, विठू माऊली तू या गीतांमधून सेवा अर्पण केली.
कार्यक्रमाचे संचलनातून श्री अशोक वानरे यांनी त्यांच्या शैलीत भक्तीमय वातावरण निर्माण केले. सर्व गायक कलाकारांसोबत श्री सत्त्येंद्र चौधरी आणि सौ. विजया आढे यांनी पण दर्शनासह कार्यक्रमाचा आनंद घेतला….
मंदिर संस्थान तर्फे पुजारी हरिष महाराज बासरकर यांनी सरस्वती मातेच्या गळ्यातील हार कृपाशिर्वाद प्रसादरुपी सर्वांना घालून व प्रसाद दिला. आणि महिलांना खण, नारळ, बांगड्या, कुंकू ओटी भरुन प्रसाद देऊन जणू श्री ज्ञानसरस्वती मातेने यशस्वीतेची पावती च दिली.
शेवटी मंदिर प्रशासनाचे आभार मानून व सर्वांनी मिळून मंदिरात दर्शन व देवी ची परवानगी घेऊन, जेवण करुन सेलू कडे दुपारी 3.30 ला प्रस्थान केले.

Check Also

सेलूत शनिवारी ‘सन्मान कर्तृत्वाचा’ सोहळा

सेलू ( प्रतिनिधी ) येथील स्व. अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले …