09/05/26
Breaking News

कळमनुरीत अवैध वृक्षतोडीवर वनविभागाची कारवाई; शिवण लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त

कळमनुरी / प्रतिनिधी  – शहरातील लमाण मंदिरासमोर अवैध वृक्षतोड करून शिवण प्रजातीचे लाकूड वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ कारवाई करत टेम्पो जप्त केला. जप्त करण्यात आलेला टाटा कंपनीचा टेम्पो (क्र. MH 16 Q 1288) विभागीय कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

ही कारवाई विभागीय वनाधिकारी राजेंद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक वनसंरक्षक सचीन माने आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कु. मीनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. कळमनुरी येथील वनरक्षक अशोक चव्हाण यांनी कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.

वनविभागाकडून अवैध वृक्षतोड व लाकूड तस्करीविरोधात कठोर पावले उचलली जात असून, संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Check Also

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा वर्षपूर्ती ‘संकल्प सप्ताह’ साजरा

​हिंगोली,दि 07 ः हिंगोली जिल्ह्याला थॅलेसेमियामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ‘एक पाऊल थॅलेसेमिया …