25/06/26
Breaking News

अंत्योदय आणि एकात्म मानववादाचा विचार घराघरात पोहोचवा-माजी मंत्री डॉ.भागवत कराड

बाळु जाधव
हिंगोली,दि 17 ः

भारतीय जनता पक्ष हा केवळ सत्तेसाठी चालणारा पक्ष नसून तो एका विशिष्ट विचारधारेवर आधारलेला पक्ष आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला अंत्योदय आणि एकात्म मानववाद हाच आमच्या कार्याचा मुख्य गाभा आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांने ही विचारधारा आणि केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजना घराघरात पोहोचवाव्यात असे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.
हिंगोली येथे आयोजित भाजपा कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते समारोपीय भाषणात ते बोलत होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ. कराड पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या अकरा वर्षांत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या आहेत. विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा आणि प्रत्येक बुथ स्तरावर पक्षाची ताकद वाढवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेत माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा,प्रदेश प्रवक्ता विनोद वाघ,भाजप नेते किरण पातुरकर,मराठवाडा संयोजक मनोज पांगरकर,प्रदेश प्रवक्ता किशोर शितोळे यांनी विविध तांत्रिक आणि राजकीय विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी खासदार रामराव वडकुते,आमदार तान्हाजीराव मुटकुळे, आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, जिल्हा संयोजक फुलाजीराव शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर,उज्वलाताई तांभाळे शिवाजीराव मुटकुळे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या …