21/07/26
Breaking News

वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतकऱ्यांच्या सोलार यंत्रणेचे मोठे नुकसान

पुर्णा,दि 02 ः
रविवारी सायंकाळी आहेरवाडी गावात पांढरी शिवारात काही ठिकाणी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी सोलार पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोलार प्लेट उडून गेल्या तर काही ठिकाणी लोखंडी संरचना कोसळल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
विशेषतः शेतीपंपासाठी बसविण्यात आलेल्या सोलार यंत्रणांना मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी पॅनल तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी झाडे आणि फांद्या सोलार प्लेटवर कोसळल्यानेही नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वादळी वाऱ्यासोबत पावसानेही हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सजगीर हिरागीर महाराज देवस्थाना जवळ चे लाईटचे पाच ते सात विजेचे पोल पडल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आहे अनेक गावांमध्ये वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. धर्मराज पंडितराव मोरे यांच्या गट नंबर. 62 व19 पांढरी शिवारातील सोलार पॅनल कोसळून नुकसान झाले आहे. लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाने पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

Check Also

पूर्णा तालुक्यात 5.5 कोटींची शेतकरी फसवणूक; 6,800 क्विंटल शेतमाल घेऊन भुसार व्यापारी फरार

₹5.5 Crore Farmer Scam! Trader Absconds with 6,800 Quintals of Produce पूर्णा प्रतिनिधी / सुशील …