12/06/26
Breaking News

आरक्षण उपवर्गीकरणाच्या निषेधार्थ सेलूत मोर्चाचे आयोजन

सेलू ( प्रतिनिधी )
अनुसूचित जाती एस सी च्या आरक्षणात अ ब क ड उपवर्गीकरण करून बदर समिती व महाराष्ट्र शासन हे समाजात फूट पाडून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या निषेधार्थ सेलूत दि १५ जून सोमवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता भव्य शांतता पूर्ण मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे .
या निर्णयामुळे समस्त आंबेडकरी अनुयायांमध्ये असंतोष पसरला असून हे उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे अशी मागणी यावेळी केली जाणार आहे .
याबाबत चे निवेदन सेलू पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण नागरे समस्त आंबेडकरी अनुयायी यांच्या वतीने देण्यात आले आहे.

सदरील मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर बसस्थानक, जिंतूर नाका, लक्कड कोट मार्गे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर नेण्यात येणार आहे.उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्याचे निवेदन देण्यात येणार आहे. संपूर्ण मोर्चा शांततापूर्ण मार्गाने काढण्यात येणार आहे.
हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारच्या आरक्षण उपवर्गीकरण धोरणाचा निषेध करत उपवर्गीकरण रद्द करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले .
यावेळी अशोक अंभोरे ,प्रदीप धापसे ,सिद्धार्थ गायकवाड, राहुल जाधव, विलास कांबळे, बापू धापसे, विनोद धापसे,रोहन आकात, प्रतीक सावंत, राजू सावंत, उत्तम लोखंडे सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

खडकपुरा गल्लीत गोदामावर धाड,92 हजार 248 रुपयांचा मुद्देमाल जप्त

गंगाखेड,दि 12  गंगाखेड शहरातील खडकपुरा गल्लीत दि १० जुनच्या मध्यरात्री अवैध गुटखा साठ्यावर स्थानिक गुन्हे …