17/07/26
Breaking News

लॉयन्स क्लबच्या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा -पोलीस निरीक्षक अरुण नागरे

सेलू ( प्रतिनिधी )
निसर्गोपचार व ॲक्युप्रेशर थेरपी काळाची गरज आहे लॉयन्स क्लब च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबीराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पोलिस निरीक्षक अरुण नागरे यांनी केले.
येथील माय स्कीन रुगणालयात लॉयन्स क्लबच्या वतीने 09 जून रोजी आयोजित निसर्गोपचार व ॲक्युप्रेशर थेरपी शिबीराचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवणारायण मालाणी, अध्यक्ष सुयश पटवारी, सचिव डॉ.बाळासाहेब जाधव, फिजिओ प्रमोद कुमार, जयपाल भाटी, अजय भाटी , उपाध्यक्ष अजित सराफ, कोषाध्यक्ष डॉ शैलेश मालाणी, सहसचिव डॉ अनुराग जोगदंड, जयसिंग शेळके, डॉ आशिष मेहता, राजेंद्र सराफ, डॉ कुंदन राऊत, वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्याक्रमाचे प्रस्ताविक डॉ बाळासाहेब जाधव सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर सुयश पटवारी यांनी आभार मानले.
6 दिवस चालणाऱ्या या आरोग्य शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लॉयन्स क्लब ऑफ सेलूच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …