12/06/26
Breaking News

विटा येथे महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयाचा निर्धार

परभणी | प्रतिनिधी
परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश दादा विटेकर यांच्या गावी महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती ठरवत शिवसेना उमेदवार सईद भैय्या खान यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीस शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, आमदार राजेश दादा विटेकर, पक्षनिरीक्षक पद्माकर मोराडे, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती पदाधिकारी तसेच महायुतीचे विविध पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार राजेश दादा विटेकर यांनी परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत महायुती पूर्णपणे एकसंघ असल्याचा विश्वास व्यक्त केला. महायुतीचे शिवसेना उमेदवार सईद भैय्या खान यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

जनहिताची कामे आणि विकास प्रकल्पांना अधिक गती देण्यासाठी महायुती सरकार अधिक सक्षम व बळकट होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही महायुतीचे उमेदवार सईद भैय्या खान यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.दरम्यान, आमदार राजेश दादा विटेकर यांनी व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल व दिलेल्या पाठिंब्याबद्दल सईद भैय्या खान यांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Check Also

खडकपुरा गल्लीत गोदामावर धाड,92 हजार 248 रुपयांचा मुद्देमाल जप्त

गंगाखेड,दि 12  गंगाखेड शहरातील खडकपुरा गल्लीत दि १० जुनच्या मध्यरात्री अवैध गुटखा साठ्यावर स्थानिक गुन्हे …