12/06/26
Breaking News

माजी सैनिक स्व दत्तात्रय शिंदे यांना विविध उपक्रमाने अभिवादन

गंगाखेड प्रतिनिधी :-
स्वर्गीय दत्तात्रय शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि १० जून रोजी उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन, रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम व वृक्षारोपण करून विविध उपक्रमांनी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
प्रथम तालुक्यातील महातपुरी येथे फौजी फॉर्म येथे परिवारांच्यावतीने स्व दत्तात्रेय शिंदे यांच्या समाधीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे माजी सैनिक स्व दत्तात्रेय शिंदे यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन, रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम व वृक्षारोपण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून लाभलेले वैद्यकीय अधिक्षक गंगाखेड डॉ हेमंत मुंडे, डॉ केशव मुंडे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार विश्वनाथ सातपुते, कॅप्टन सूर्यकांत मुंडे, परमेश्वर जवादे, मारुती सूर्यवंशी, मदनराव शिंदे, बालासाहेब यादव, महादेव फड, गोविंद फड, गंगाधर फड यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर, फळ वाटप व वृक्षारोपणाचे कार्यक्रम संपन्न झाला.
पत्रकार आनंद शिंदे यांचे ते वडील होत. पुढे पत्रकार शिंदे यांनी त्यांच्या जीवनाचा उजाळा देत पुढे म्हणाले वडिलांनी कायम आम्हा मुलांचा विचार केला. वडिलांनी दिलेले संस्कार, दिलेली शिकवण व सामाजिक बांधिलकी, ही वडिलांची शिकवण आहे. त्याचेच आम्ही पालन करतो. वडिलांनी भारतीय सैन्यात सोळा वर्षे देश सेवा केली व आम्हाला देशसेवेचे धडे पण दिले.
यावेळी प्रा वैजनाथ गायकवाड, प्रा विष्णू असोरे चंद्रकांत साळवे, प्रशांत रोडे, दत्तराव जाधव, बालाजी जवादे, प्रकाश साबणे, राजू वानखेडे, किशन वाघमारे, कल्याण आळसे, शशिकांत शिंदे, अविनाश शिंदे, सोहम शिंदे, श्रवण शिंदे यावेळी आदीनी परिश्रम घेतले.

Check Also

खडकपुरा गल्लीत गोदामावर धाड,92 हजार 248 रुपयांचा मुद्देमाल जप्त

गंगाखेड,दि 12  गंगाखेड शहरातील खडकपुरा गल्लीत दि १० जुनच्या मध्यरात्री अवैध गुटखा साठ्यावर स्थानिक गुन्हे …