23/06/26
Breaking News

बोरी ग्रामस्थांचे उपोषण स्थगित,प्रशासनाकडून अश्वासन …अप्पर तहसिल कार्यालयाचा लढा …

परभणी,दि 23ः
बोरी ता.जिंतुर या ठिकाणी मंजूर झालेले अपर तहसील इतर ठिकाणी हलवल्याच्या निषेधार्थ बोरी ग्रामस्थांच्या वतीने गेल्या अकरा दिवसापासून येथील बाजार मैदानावर उपोषण सुरू करण्यात आले होते. हे उपोषण दिनांक 23 जून रोजी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या आश्वासनानंतर उपोषणाला स्थगिती दिल्याची माहिती उपोषण कर्त्यांनी यांनी दिली

अप्पर तहसील कार्यालय बोरी येथे सुरु करण्याची सर्व प्रक्रिया झालेली असताना अचनाक बोरी ऐवजी चारठाणा येथे तहसिल कार्यालय मंजुर करण्यात आले.त्यामुळे बोरीकांनी आपल्या हक्कासाठी लढा सुरु केला.बोरी येथे तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवून परिसरातील 44 गावामार्फत वेगवेगळे आंदोलन करण्यात आले होते, नंतर या ठिकाणी आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते परंतु प्रशासनाचे कोणत्याही अधिकारी या ठिकाणी फिरकत नसल्यामुळे येथील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजयराव चौधरी यांच्या नेतृवात कृती समितीने शिष्टमंडळ मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्रशासनाकडे सूत्र फिरवल्यानंतर नंतर जिल्हाधिकाऱ्यामार्फत उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी 23 जून रोजी दुपारी दीड वाजता उपोषण स्थळी भेट देऊन आपले उपोषण मागे घ्या शासनामार्फत अप्पर तहसील साठी आपण पाठपुरावा सुरू राहील असे अश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांना उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी लिंबू शरबत देऊन उपोषणकर्त्यांनी उपोषणाला स्थगिती दिल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी नायब तहसीलदार प्रशांत राखे, मंडळ अधिकारी नंदकिशोर सोनवणे, तलाठी शंकर गोरे व बोरी परिसरातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य चेअरमन विविध पक्षाचे पदाधिकारी व्यापारी, पत्रकार, डॉक्टर, नागरिकांची मोठी उपस्थिती होती

.

Check Also

सेलूमध्ये महेश नवमीनिमित्त आरोग्य शिबिराला ३२१ नागरिकांचा प्रतिसाद

सेलू ( प्रतिनिधी ) माहेश्वरी समाजाचा पवित्र सण ‘महेश नवमी’चे औचित्य साधून सेलू तालुका माहेश्वरी …