हिंगोली,दि 24 ः
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे महासचिव शेतकऱ्यांचे तारणहार युवानेते आमदार रोहित पवार हे पंढरपूर शेतकरी कर्जमुक्ती अन्नत्याग आंदोलनानंतर पहिल्यांदा शुक्रवारी (ता.26) हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार असून सकाळी ९:३० वाजता राष्ट्रवादी भवन हिंगोली येथे शेतकरी-शेतमजूरांसोबत संवाद साधणार आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
शेतकरी-शेतमजूर संवाद बैठकीस हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष ॲड.रवि शिंदे, विधानसभा अध्यक्ष बंडू मुटकुळे, गणेशराव गडदे,माजी जि.प. उपाध्यक्ष मनीष आखरे,माधव कोरडे,युवक जिल्हाध्यक्ष सोनू चव्हाण,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश जोगदंड, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष आयुबभाई पठाण,तालुकाध्यक्ष डॉ.संतोष बोंढारे,धीरज काकडे,यशवंतराव देशमुख,गजानन गव्हाणे,शहराध्यक्ष मुजीब पठाण मोईन बागवान,ॲड.शेख मोहसिन, दिलीपराव राखोंडे,सिराजभाई कुरेशी,आनंदराव कदम,अभिजीत देशमुख,डॉ.वेदांत मरळे,प्रा.गजानन थोरात,युवक तालुकाध्यक्ष सुशील बोंढारे,शोएब सिद्दीकी,राजू बाभळे, सुनील मस्के,गणेशराव लेकुळे,प्रफुल पाईकराव,लक्ष्मण पोटे,सुदर्शन वायकोळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हिंगोली जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात येते.

Shabdraj www.shabdraj.com