24/06/26
Breaking News

सेलूत जागतिक एकल महिला दिन उत्साहात साजरा

सेलू ( प्रतिनिधी )
महिला व बाल विकास विभाग दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान आणि नगर परिषद सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकल महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला .

नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगर परिदेच्या महिला व बालकल्यान समितीच्या सभापती शीला रामेश्वर काजळे या होत्या
तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा अगणि बँक परभणीचे व्यवस्थापक रामचंद्र अकोलवार आणि भारतीय स्टेट बँकेची वित्तीय साक्षरता विभागाचे सुनील हतेकर यांनी महिलांना विविध बँकिंग सेवा विमा योजना कर्ज योजना तसेच आर्थिक सक्षमीकरणासाठी उपलब्ध संधी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जिल्हा समोर एक सचिन चव्हाण आणि कौशल विकास मार्गदर्शन अधिकारी मदन शिंदे यांनी रोजगार व विविध संधीसह शासकीय योजनांची माहिती दिली उपस्थितीत उपस्थित महिलांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेत विविध योजनांविषयी माहिती जाणून घेतली राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली .
सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती होती. रामेश्वर काजळे यांनी महिलांना शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सहकार करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याधिकारी भगवान चव्हाण यांनी केले नगरपरिषदेमार्फत लाभ देणारे विविध योजनांची माहिती सहाय्यक प्रकल्प अधिकारी शितल सोळंके यांनी दिली सूत्रसंचालन कर निरीक्षक अंकुश जाधव यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद दायमा , धनंजय सिंह बायस, दिनेश टाक, महेंद्र ढाले, कृष्णा कदम आनंद काबरा नागेश चिखलीकर जितू अजिम शेख ,शिल्पा मगर ,शारदा इंगळे, विद्या महाडिक ,तसेच नगर परिषद चे सर्व अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेतले एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Check Also

आमदार रोहित पवार शुक्रवारी हिंगोलीत

हिंगोली,दि 24 ः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे महासचिव शेतकऱ्यांचे तारणहार युवानेते आमदार रोहित …