सेलू ( प्रतिनिधी )
सेलू् येथील नूतन विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त शुक्रवारी, २६ जून २०२६ रोजी सकाळी अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना शिक्षक राजेंद्र सोनवणे म्हणाले की, शाहू महाराज हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक आणि कोल्हापूर संस्थानचे छत्रपती होते. त्यांनी आयुष्यभर बहुजन समाज, दलित आणि वंचितांच्या उद्धारासाठी कार्य केले. २६ जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय समाजासाठी ५०% आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केली, ज्यामुळे त्यांना आरक्षणाचे जनक म्हटले जाते.यावेळी मुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक एस.जी. बोधनापोड, बी.एस.हेलसकर, सुनील तोडकर, व्यंकट तोरणाळे, संतोष क्षीरसागर, विशाल क्षीरसागर, फुलचंद गावीत, सच्चिदानंद डाखोरे, राहुल रोकडे, मुकुंद डमरे, अश्विनी पटाईत, निर्मला कांदळे, अरूण रामपूरकर आदींसह शिक्षक उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com