परभणी | प्रतिनिधी
इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन, महाराष्ट्र शाखा (परभणी) यांच्या वतीने आयोजित ‘गौरव अवॉर्ड 2026’ पुरस्कार वितरण व सत्कार सोहळ्यात जिल्ह्यातील सुप्रसिद्ध समाजसेवक, गोसेवक व गौरक्षक नितीन जाधव गोगलगावकर यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
दि. 28 जून 2026 रोजी स्टेशन रोड, परभणी येथील हॉटेल विसावा कॅफे सभागृहात हा सोहळा पार पडला. यावेळी नितीन जाधव गोगलगावकर यांना सन्मानपत्र व गौरवचिन्ह प्रदान करून त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.
नितीन जाधव गोगलगावकर हे गौरक्षक सेना, वीर वारकरी सेवा संघ आणि राष्ट्रजन फाउंडेशन, परभणी यांच्या माध्यमातून गोसंवर्धन, पशु-पक्षी संरक्षण, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, जलसंवर्धन तसेच विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहेत. याशिवाय समाजासाठी कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्यही ते करत आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रनिर्माणरत्न इंजि. आर. डी. मगर होते. प्रमुख पाहुणे म्हणून गफार मास्टर, प्रा. मोहनराव मोरे, अॅड. व्ही. एम. कोल्हे, सैफोद्दीन सिद्दिकी, क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (NGO)च्या डायरेक्टर फरहा नाज अंजुम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रौनक कोसडीकर, शाहेद सिद्दिकी, बशीर अहमद, डॉ. अब्दुल करीम, डॉ. तखीयोद्दीन सिद्दिकी, एस. के. गौस आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन महेमुद खान यांनी केले होते. यावेळी शेख सरफराज भाई, मोईन खान, राजीव भारद्वाज, मोहम्मद जहांगीर, मदनबापू कोल्हे, डॉ. जयदीप कोपरेकर, देवानंद वाकळे, मुबीन खान, शहेबाज खान तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com