बीड : बीड जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. बीडच्या माजलगाव येथे सावकारी परवाना देण्यासाठी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर 13 हजार रुपये स्वीकारताना सहायक निबंधक कार्यालयीन अधीक्षक आणि खाजगी व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आले. माजलगाव येथील सहायक निबंधक कार्यालयात हा ट्रॅप करण्यात आला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
माजलगाव येथील सहाय्यक निबंधक, कार्यालयात सावकारीचा परवाना (लायसन्स) मंजूर करून देण्यासाठी पंधरा हजार रुपयाची मागणी करून 13 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक निबंधक सुरज जगदाळे आणि सहकार अधिकारी (श्रेणी-२) सतीश शेरखाने व खाजगी इसम महेश फपाळ यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले केले. या कारवाईमुळे माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
तीन व्यक्ती रंगेहाथ ताब्यात
एका नागरिकाने सावकारीचा परवाना मिळविण्यासाठी अर्ज केला होता. संबंधित परवाना मंजूर करून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी 15 हजाराची मागणी केली होती, अॅडव्हान्स म्हणून 13 हजार देण्याचे ठरवले. त्रस्त झालेल्या तक्रारदाराने जालना एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचला. मंगळवारी सहाय्यक निबंधक कार्यालयात तक्रारदाराकडून 13 हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने सहाय्यक निबंधक सुरज जगदाळे आणि सहकार अधिकारी (श्रेणी-२) सतीश शेरखाने व खाजगी इसम महेश फपाळ या तीन व्यक्तींना रंगेहाथ ताब्यात घेतले.
कसा रचला सापळा?
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसबीच्या पथकाने मंगळवारी अत्यंत गोपनी. पद्धतीने सापळा रचला. मंगळवार दुपारी तीनच्या सुमारास ठरल्याप्रमाणे तक्रारदार पैसे देण्यासाठी मंगळवारी दुपारी ठीक तीन वाजण्याच्या सुमारास ठरल्याप्रमाणे तक्रारदार पैसे देण्यासाठी कार्यालयात पोहोचले. सहाय्यक निबंधक सुरज जगदाळे आणि अधीक्षक सतीश शेरखाने यांच्या संमतीने 13 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली जात असतानाच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून तिन्ही आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे.
Shabdraj www.shabdraj.com