नीट पेपर लिक प्रकरणी देशभरात जन आंदोलनाचा भडका उडाला आणि अखेरीस केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. ही घटना ताजी असताना महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाची समजली जाणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपर लिक झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यानंतर आता तक्रारदार सुद्धा समोर आला आहे. तक्रारदार ऋषिकेश गांगर्डे याने संशयितांच्या मोबाईल फॉरेन्सिक आणि CBI चौकशीची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात MPSC औषध निरीक्षक भरतीचाही पेपर लीक झाल्याचे समोर आले आहे. परीक्षा आधीच 78 प्रश्न व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याची माहिती समोर आली आहे. 22 मार्चचा पेपर 20 मार्चला व्हॉट्सॲपद्वारे बाहेर आल्याचं आरोप करण्यात येत आहे.
पर लीक झाल्याची तक्रार सुरुवातीला दोन विद्यार्थ्यांनी MPSC आयोग आणि FDA विभागाकडे केली होती. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता. दरम्यान, दोन तक्रारदारांपैकी छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्याने तक्रार मागे घेतली आहे. मात्र, अहिल्यानगर येथील तक्रारदार ऋषिकेश गांगर्डे या विद्यार्थ्याने तक्रार मागे घेण्यास नकार दिला आहे. तर ऋषिकेशने या घोटाळ्यातील संशयितांचे मोबाईल फॉरेन्सिकद्वारे तपासण्याची मागणी केली आहे.
पेपर लिक झाल्याचा संशय कसा आला
पेपर लिक झाल्याचा संशय कसा आला
आधी निकाल लागला नव्हता, त्यासाठी एक पोस्ट केली होती. अचानक ज्या मुलांंची निवड झाली आहे, त्यांचे मार्क न दाखवता सलेक्शन करण्यात आलं होतं. त्यानंतर गौरव याने मला फोन करून याचे पुरावे दिले. आम्ही अन्न औषध विभागाकडे तक्रार दिली होती. मग आम्ही एमपीएसी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. गौरव सुद्धा माझ्यासोबत होता. २४ जुलै रोजी आम्ही तिथे गेलो तिथे लेखी तक्रार दिली होती. लिंडवे सर तिथे भेटले होते, सोमवारी पोहोच पावती देणार असं सांगितलं. पण, आज अचानक गौरवने दबावातून तक्रार मागे घेतली. त्याचे वडील माझ्याकडे आले होते. त्यांनीही तसं सांगितलं. मी तक्रार मागे घेतली नाही. एका क्लासचा गेस पेपर होता, मग १०० पैकी ९० प्रश्न सेम होते, मग आयोग काय क्लास चालवत आहे, इतकं सेम कसं येऊ शकतं. इतकचं असेल तर क्लासचालक आणि संशयितांचे मोबाईल तपासले पाहिजे, अशी मागणी ऋषिकेशने केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे स्पष्टीकरण
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक भरती प्रकरणी आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी अधिक माहिती देण्यास सुरुवातीला नकार दिला होता. सीबीडी बेलापूर येथील एमपीएससी कार्यालयात या संदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या प्रकरणी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी भाष्य करण्यास महाराष्ट्र लोक आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी बोलण्यास नकार दिला होता, उद्यापर्यंत माहिती देऊ असं म्हणत माध्यमांशी बोलणं टाळलं होतं. पण, माध्यमांच्या दबावानंतर अन्न व औषध प्रशासन विभागातील ‘औषध निरीक्षक (गट-ब)’ भरती परीक्षेतील पेपरफुटीबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करून संबंधितांविरोधात पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी सांगितलं आहे.
Shabdraj www.shabdraj.com