01/09/26
Breaking News

समृद्धी महामार्गावरील दरोड्याचा मुख्य सूत्रधार जाळ्यात

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर २६ ऑगस्ट रोजी झालेल्या रोड रॉबरी प्रकरणात बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंगा येथील किरण अजिनाथ गायकवाड याचा सहभाग समोर आला आहे. पोलिसांनी काल रात्री त्याला त्याच्या घरातून अटक केल्याची माहिती आहे. समृद्धी महामार्ग पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. यात किरण गायकवाडचा किती गुन्हा मध्ये सहभाग आहे त्याच्यासोबत कोण कोण साथीदार आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.

या घटनेत गाडीत गंभीर रुग्ण असतानाही दरोडेखोरांनी वाहनातील प्रवाशांना बेदम मारहाण करून लुटमार केल्याचा आरोप आहे. दरोडेखोरांनी रस्त्यावर लोखंडी वस्तू फेकल्याने संबंधित गाडीचे इंजिन खराब झाले. इंजिनमधून ऑइल गळू लागल्याने वाहन थांबवावे लागले, त्यानंतर लुटमार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, लुटमार झालेल्या व्यक्तीच्या वाहनात कॅमेरा असल्याने आरोपींचे चेहरे स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली असून, प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेत दरोडेखोरांनी ‘एर्टिगा’ गाडीला लक्ष्य केले होते. दरोड्यादरम्यान गाडी चालक किरण खंदारे यांच्या खिशातील ७ हजार रुपयांची रोख रक्कम, डिगीत ठेवलेले ३४ हजार रुपये तसेच गळ्यातील २ तोळ्यांची सोन्याची साखळी आणि ५ ग्रॅमची अंगठी असा ऐवज लुटण्यात आला. प्रवाशांनी लुटमारीला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी त्यांना अमानुष मारहाण केली.
विशेष म्हणजे, आमदार संतोष बांगर यांच्या शिफारस पत्रावरून एका गंभीर रुग्णाला तातडीच्या उपचारासाठी हिंगोली जिल्ह्यातील लोहगाव येथून मुंबईला घेऊन ही गाडी निघाली होती. मात्र, समृद्धी महामार्गावरील दुसंगवाडी शिवारात हा भयंकर प्रकार घडला. याप्रकरणी चालक किरण खंदारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आ

Check Also

पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

हिंगोली शहरात एका पोलिस उपनिरीक्षकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. …