मनोज जरांगे पाटील यांनी तब्येत बिघडल्यानंतरही आक्रमक भूमिका घेतली आहे. बीडच्या पाटोद्यामध्ये डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. मला आज जाता आलं नाही, त्यामुळे गुरुवारी उद्या दुपारी 1 वाजता मुंबईकडे निघणार आहे, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. मी मेलो तरी हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला. सरकारचा ड्राफ्ट वाचल्यानंतर मराठ्यांना महत्वाचा संदेश देईल, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारला पुन्हा आव्हान दिलं. मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘मी मुंबईला जाणार आहे थांबणार नाही. मी गुरुवारी एक वाजता मुंबईच्या दिशेने निघेल. सरकारने काहीतरी ड्राफ्ट पाठवलाय. नारायणगडाच्या महंतांनी/गुरू गादीने विनंती केल्यानंतर सलाईन घेतली. मला उठता बसता येत नाही. हाता-पायात पोटात प्रचंड आग होत आहे. मी 100 टक्के मुंबईला जाणार म्हणजे जाणार. रात्रीतून सलाईन घेणार. सरपंच ड्राफ्ट घेऊन येत आहेत. आजचा दौरा थांबला. पण उद्याही त्या मार्गाने मी जाऊ शकतो. मी 18 तारखेला आझाद मैदानावर 10 वाजता जाणार आहे. उद्या थेट जाणार आहे, उद्या जवळ थांबतो. मला कोण जाऊ देत नाही, ते बघायचंय. मला जाऊ दिलं नाही तर मराठे बोलावणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
‘पोलीस हे फडणीस, एकनाथ शिंदेंना अडचणी आणणार, 5-10 गाड्या येणार असल्याचे सांगितले. लाठीचार्ज झाला तर सरकार पडू शकतं, अडवलं तर मराठे लाखाने, कोटीने येणार आहे. आम्ही त्याच मार्गाने जाणार आहे, पण रस्त्यात थांबवू नका. हार, फुले नको. आमचा उद्या श्रीगोंदा, हडपसर, खोपोलीला मुक्काम नाही. पण उद्या जवळ जाणार आहे. आमचेही चर्चेचे दारं बंद नाहीत..कधीही या आणि कुठेही या. मला रात्री 3 वाजल्यापासून काही कळत नव्हतं. कोणाशीही माझं बोलणं झालं नाही. तुम्हाला आणि समाजाला सोडून काही नाही.. तुम्ही आणि समाजाशिवाय कोणी नाही. कोण मंत्री म्हणतोय, मुंबईत येऊ देणार नाही..त्याच्या घरी जातो. तीन वर्ष माझी भाषा गोड लागली.. कॅबिनेट एकतर्फी असते का, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.
Shabdraj www.shabdraj.com