16/10/26
Breaking News

ब्राह्मणवाडा येथे शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या

औंढा नागनाथ,दि 29 (प्रतिनिधी)ः
तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 28 सप्टेंबर रोजी घडली. तानाजी विठोबा मोरे वय 59 असे मयत  अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे.

यंदा खरीप हंगामात दोन महिन्यापासून पावसाने दंडी दिल्याने शेतातील पिकाची अवस्था बिकट झाली व सर्व सोयाबीन डोळ्यासमोर वाळून गेली त्यामुळे सततची नापिकी आणि यंदा हातातून जात असलेले पीक पाहून ते चिंतेत होते, दरम्यान त्यांनी शेतात फवारण्यासाठी वापरण्यात येणारी विषारी औषध प्राशन केले, त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली दोन मुलं सुना व नातवंड असा परिवार आहे.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …