16/10/26
Breaking News

गळीत हंगामापूर्वी ऊस दर जाहीर करा, शेतकरी संघर्ष समितीची मागणी

गंगाखेड / परभणी (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपर्यंत साखर कारखाने सुरू करण्याचे निर्देश दिले असताना अद्यापही उसाचे दर जाहीर न झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, परभणीने जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना निवेदन दिले.

जी-७ शुगर्स माखणीसह सर्व कारखान्यांना दि. २९ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १५ ऑक्टोबरपूर्वी ऊस दर जाहीर करूनच गळीत सुरू करावे, अन्यथा मागील वर्षाप्रमाणे तीव्र आंदोलन छेडले जाईल.

१) गळीतापूर्वी दर जाहीर करावा.
२) पहिली उचल ४२५० रु. व अंतिम भाव ५००० रु. प्रति टन द्यावा.
३) ऊस बिले तात्काळ अदा करावीत.
४) मागील हंगामाची थकीत ऊस व तोडणी-वाहतूक बिले त्वरित द्यावीत.
५) साखर दरवाढीचा लाभ म्हणून मागील हंगामातील उसाला प्रति टन ३०० रु. अतिरिक्त द्यावे.यावेळी कॉ. राजन क्षीरसागर, कॉ. अजय बुरांडे, ओंकार पवार, सुरेश इखे, लक्ष्मण पौळ व शेकडो ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

 

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …