औंढा नागनाथ: प्रतिनिधी
हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे आणि कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील खरीप व फळपिकांच्या झालेल्या अतोनात नुकसानीचे पंचनामे करण्यास गतीने सुरुवात झाली आहे.
यंदा अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे तालुक्यातील शेतीचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या ‘ट्रिगर-१’ नुसार महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, यामध्ये औंढा नागनाथ तालुक्याचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर महसूल, कृषी व ग्रामपंचायत प्रशासनाकडून संयुक्तपणे नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पोटा खुर्द शिवारात प्रत्यक्ष पाहणी
मौजे सुरेगाव येळेगाव सुरवाडी धारखेडा या’ शिवारात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी संयुक्त पथकाने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. यामध्ये , सहायक कृषी अधिकारी पी यु वैद्य, आणि ग्राम महसूल अधिकारी पुष्पलता जायभाये, ग्रामपंचायत अधिकारी सुनील राठोड , शेषराव सोळंके भुजंग सोळंके गजानन सोळंके, नवनाथ सोळंके सुरेश सोळंके यांच्या उपस्थितीत हे पंचनामे करण्यात येत आहेत.
Shabdraj www.shabdraj.com