17/10/26
Breaking News

शारदा विद्यामंदिरच्या खेळाडुंची जिल्हास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी!

कळमनुरी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल, हिंगोली येथे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कळमनुरी येथील शारदा प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर, शास्त्रीनगर येथील १४ वर्षांखालील मुलांच्या सेपकटकरा (Sepaktakraw) संघाने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील विविध शाळांचे संघ सहभागी झाले होते. अटीतटीच्या सामन्यांमध्ये शारदा विद्यामंदिरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय, चपळता, कौशल्य आणि सांघिक खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात करत विजय मिळवला. या यशामुळे कळमनुरी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या यशामागे शाळेचे क्रीडा शिक्षक तथा मार्गदर्शक श्री. शंकर पावडे सर यांचे कठोर परिश्रम, अचूक मार्गदर्शन आणि खेळाडूंनी घेतलेला नियमित सराव महत्त्वपूर्ण ठरला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले.

विद्यालयाच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेषराव कऱ्हाळे सर, क्रीडा मार्गदर्शक श्री. प्रकाश अडकिने सर आणि समृद्धी युथ अँड स्पोर्ट्स फाउंडेशन, हिंगोलीचे संचालक श्री. बजरंग कदम यांच्या वतीने विजयी खेळाडू आणि मार्गदर्शक शंकर पावडे सर यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच आगामी विभागीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक आणि क्रीडाप्रेमींनी खेळाडूंचे कौतुक केले असून, आगामी विभागीय स्पर्धेतही खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Check Also

आरक्षण उपवर्गीकरण मोर्चाच्या तयारीसाठी सेनगावात मातंग समाजाची बैठक

सेनगाव प्रतिनिधी मोहन कांबळे  मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी १३ नोव्हेंबर रोजी सेनगाव येथे आयोजित …