17/10/26
Breaking News

गॅस सिलिंडरसाठी ११०० रुपये घेतल्याचा आरोप; ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याची तक्रार!

हिंगोली,दि 17
शेतकरी आधीच पावसाच्या अनियमिततेमुळे आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडले असताना, आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दराबाबतही ग्राहकांकडून तक्रारी समोर येत आहेत. भारत गॅसच्या अंबरवाडी येथील वितरण गाडीवरून गॅस सिलिंडर घेताना ११०० रुपये आकारण्यात आल्याचा आरोप ग्राहक ज्योती मोहन कांबळे यांनी केला आहे.
शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास भारत गॅसची अंबरवाडी येथील वितरण गाडी आली होती. यावेळी ज्योती मोहन कांबळे यांनी गॅस बुकिंग केल्यानंतर भरलेल्या सिलिंडरसाठी ११०० रुपये घेतल्याचे त्यांनी सांगितले. या व्यवहाराचा ऑनलाइन अहवालही उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सध्या शेतकरी पावसाअभावी पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांवरही महागाईचा भार वाढत आहे. त्यातच सणासुदीच्या काळात घरगुती गॅस सिलिंडरसाठी अधिक पैसे द्यावे लागत असल्याची तक्रार समोर आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Check Also

आरक्षण उपवर्गीकरण मोर्चाच्या तयारीसाठी सेनगावात मातंग समाजाची बैठक

सेनगाव प्रतिनिधी मोहन कांबळे  मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी १३ नोव्हेंबर रोजी सेनगाव येथे आयोजित …